Posts

मी...

मी भिजलेलं रान तू थिजलेलं पान मी श्रावण, तू संततधारा उधाण! तू कुंद कुंद हवा मी गंध नवा नवा तू पाऊस, अन मी बेधुंद गारवा... तू चुकलेली वाट मी सुटलेला हात अंधाऱ्या रात्रींशी माझा संवाद तू नीरव नदीकाठ मी जंगल घनदाट तू गहिऱ्या वळणाची, मी दुर्गम घाट! ' सौभद्र'